...
Sign Up Sign In

Others Activity

...
क्रीडा

खेळाचे सामने भरविणे त्यात भाग घेणे व्यायाम शाळा सुरू करणे व्यायामाचे व योगासनाचे प्रशिक्षण देणे, महिलांना व्यायामाचे महत्त्व पटवून देणे व मार्गदर्शन करणे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करणे उच्च दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी वेळोवेळी शिबिर भरवणे व अत्याधुनिक साधन सामुग्री उपलब्ध करून देणे. समाजातील गुणवंत व वरिष्ठ खेळाडूंच्या र्थिक मदत करणे.

...
पर्यावरण

पर्यावरण समतोल राखण्यासाठी शिबिरे चर्चासत्र शिबिरांचे आयोजन करून त्यामार्फत पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे. पर्यावरण विषयक जनजागृती करणे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे विविध प्रकारच्या प्रदूषणापासून होणारा पर्यावरणाचा -हास आटोक्यात आणण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, व्याख्याने, माहितीपट यातून समाज प्रबोधन करणे.

...
शेती विषयक

शेतकऱ्यांना निर्भेळ बी बियाणे रोपे खते औषधे व तांत्रिक ज्ञान सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करणे. शेतकऱ्यांना शेतात सेंद्रिय खत निर्माण करावे म्हणून प्रात्यक्षिक दाखवणे. रासायनिक खताचा वापर समतोल करणे, बाबत मार्गदर्शन करणे, कृषी विषयांची चर्चा सत्र शिबिरे व प्रात्यक्षिके दाखवणे शेती व शेतीपूरक उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव करून पुरस्कार देणे. युवकांना शेती व शेतीपूरक व्यवसायात आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन देणे व सर्वतोपरी सहकार्य करणे, कृषी मेळावे, कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करणे, मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे.

...
शैक्षणिक

शैक्षणिक कार्य करणे. उदा. बालवाडी अंगणवाडी सर्व भाषिक प्राथमिक शाळा निवासी शाळा निवासी इंग्लिश मीडियम स्कूल हायस्कूल कन्या विद्यालय महाविद्यालय तांत्रिक स्कूल महाविद्यालय वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षण, महाविद्यालय तंत्रनिकेतन संगणक प्रशिक्षण देणे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देणे निराधार आणि राष्ट्रीयत्व अनाथ मुला मुलींसाठी अनाथ आश्रम वृद्धाश्रम आश्रम शाळा सुरू करणे मुला-मुलींसाठी वस्तीग्रह बाल सदन बालकाश्रम सुरू करणे कॉम्प्युटर विषयक ज्ञान देण्यासाठी शहर व ग्रामीण भागात आर्थिक तसेच सामाजिक प्रशिक्षण वर्ग सुरू करणे मतिमंद मूकबधिर व अपंग व्यक्तीच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देणे माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पदव्युत्तर शिक्षण कोर्स उपलब्ध करून देणे. समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास व गरजवंतांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे.

...
सामाजिक

संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रम मेळावे आयोजित करणे महापुरुषांच्या जयंती कार्यक्रम आयोजित करणे गड किल्ल्यांचे पर्यटन व स्वच्छता विषयक कामे करणे, सामाजिक शिबिरांचे आयोजन करणे, बालकाश्रम बालक सदन सुरू करणे वृक्षारोपण करणे नागरिकांना धर्मदाय योजनांची माहिती देणे. समाजातील उपेक्षित व गरीब महिलांच्या उन्नतीसाठी व सक्षमीकरणासाठी शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. संस्थेच्या व संस्थेच्या सदस्यांच्या मार्फत मुंबईमध्ये विविध रुग्णालयामध्ये समाज बांधवांना वैद्यकीय मदत होण्यासाठी तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर शिक्षण क्षेत्रामध्ये समाजातील विद्यार्थ्यांना मदत व सहकार्य करणे. समाजातील सलोखा अबाधित राखण्यासाठी स्वयंसेवा संस्थेचे सहकार्य घेणे व सहकार्य करणे विधवा व परितक्त्या महिलांचे कल्याणासाठी प्रयत्न करणे अनाथांना आश्रय देऊन त्यांना मदत करणे.

...
सांस्कृतिक

सांस्कृतिक कार्यक्रम करणे. कला प्रकारांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे त्याचबरोबर सर्व स्तरावरून विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. सांस्कृतिक व इतर संमेलन आयोजित करणे व सहकार्य करणे कलावंतासाठी प्रशिक्षण देणे प्रोत्साहन देणे व सर्वतोपरी मदत करणे किंवा अशी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलाकारांचे पुरस्कार देऊन गौरव करणे व त्यांच्या भविष्यकाळासाठी इतर मदत कार्य सुरू करणे. उत्सव सण साजरे करणे. त्याचबरोबर राष्ट्रीय सण व उत्सव, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे